टीम महाराष्ट्र देशा: टू व्हीलर उत्पादक कंपनी टीव्हीएस (TVS) हि एक लोकप्रिय बाईक (Bike) कंपनी आहे. कारण टीव्हीएस नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आवृत्तीसह बाईक लाँच करत असते. सध्या टीव्हीएसने देशात आपल्या RTR Apache 160 4V ची नवीन आवृत्ती लाँच केली आहे. टीव्हीएसची ही विशेष आवृत्ती पर्ल व्हाईट कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. टीव्हीएस ने लॉंच केलेली ही स्पेशल एडिशन कंपनीच्या डीलरशिपवर उपलब्ध आहे.
टीव्हीएस (TVS RTR Apache 160 4V स्पेशल एडिशन
डिझाईन
टीव्हीएसने या बाईकची खास डिझाईन ‘ट्रॅक रोड रेसिंग’वर केली आहे. या बाईची ही रचना टेक्नॉलॉजी, कार्यप्रदर्शन, आणि शैलीमध्ये दिसून येते. टीव्हीएसच्या या बाईकची मॅट ब्लॅक स्पेशल एडिशन आधीच बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर टीव्हीएसने या बाईचे नवीन एडिशन पर्ल व्हाईट रंगांमध्ये लाँच केले आहे. ही नवीन आवृत्ती जुन्या आवृत्तीपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि खास आहे.
इंजिन
या नवीन 2023 RTR Apache 160 4V मध्ये 15.9cc ऑईल-कुल्ड इंजिन उपलब्ध आहे. जे 9250rpm वर 17.55PS पॉवर आणि 7250rpm वर 14.73Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये 5-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध आहे.
फीचर्स
टीव्हीएसची ही नवीन आवृत्ती बाजारामध्ये पर्ल व्हाईट रंगासह काळ्या आणि लाल रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये देखील उपलब्ध आहे. ही नवीन बाईकमध्ये अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर, गियर शिफ्ट इंडिकेटर सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट, अर्बन, स्पोर्ट अँड रेन सारखे राइडिंग मोड, ऑल-एलईडी हेडलॅम्प टीएम रिअर रेडियल टायर इत्यादी वैशिष्ट्यसह सादर करण्यात येणार आहे.
किंमत
या नवीन 2023 RTR Apache 160 4V ची एक्स-शोरुम किंमत 1,30,090 रुपये ठेवण्यात आलेली आहे. ही बाईक कंपनीच्या डीलरशिप वर उपलब्ध आहे. टीव्हीएसची नवीन बाईक यामाहाच्या FZ आणि FI ला बाजारामध्ये टक्कर देऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- Pak vs ENG | “माझी इंग्रजी संपली…”; पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाजाने दिले उत्तर
- Dragon Fruit | नावाप्रमाणे पॉवरफुल आहे ड्रॅगन फ्रुट, करतो ‘हे’ आजार दुर
- IPL 2023 | आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये बोली लावताना बेशुद्ध झालेले ‘ह्यूग एडमीड्स’ या वर्षीसुद्धा सांभाळणार लिलावकर्त्याची जबाबदारी
- World Aids Day | HIV ची सुरुवात कुठून झाली?, जाणून घ्या
- Amol Mitkari | “आता अस्वस्थ असलेले मुख्यमंत्री दारोदार…”, अमोल मिटकरींचा एकनाथ शिंदेंना टोला