दहावीचे हॉल तिकीट आजपासून मिळणार ऑनलाइन

टीम महाराष्ट्र देश – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये मार्च 2019 मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे (इ. 10 वी) हॉल तिकीट बुधवार (दि. 30) पासून ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याची माहिती, मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी परीक्षेची हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in अथवा www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शाळांच्या लॉगीनमध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आव्हान शिक्षण मंडळाने केले आहे.