स्टारलाईट कॉपर प्रकल्पावरील बंदीने ८०० लघु, मध्यम उद्योगांवर संक्रांत

चेन्नई : तामिळनाडूतील तूतीकोरीन शहरात वेदांता ग्रुपच्या स्टारलाईट कॉपर प्लांटविरोधात स्थानिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं होतं. स्टारलाईट कॉपर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात हे आंदोलन मागील एक महिन्यापासून सुरु आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता.

Loading...

दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन, तामिळनाडू सरकारने अखेर या प्रकल्पाला टाळं ठोकलं आहे. प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता. अखेर सामान्य नागरिकांच्या लढ्याला यश मिळालं असून, सरकारने प्रकल्प कायमस्वरुपी बंद केला आहे. तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहेमात्र आता तुतिकोरीन येथील तांबेनिर्मिती प्रकल्प बंद करण्याच्या तमिळनाडू सरकारच्या आदेशामुळे विद्युत क्षेत्रातील जवळपास ८०० लघु आणि मध्यम उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

देशातील एकूण तांबेनिर्मितीपैकी ४० टक्के निर्मिती या प्रकल्पातून होते.या बंदचा फटका केबल उत्पादक, वायडिंग वायर युनिट आणि ट्रान्स्फॉर्मर उत्पादकांना बसणार आहे. तुतिकोरीनच्या स्टरलाइट प्रकल्पातून त्यांना तांबे उपलब्ध होत असते. बहुसंख्य युनिट ही देशाच्या उत्तर आणि पश्चिम क्षेत्रात आहेत. या बंदचा परिणाम देशातील तांबे निर्यातीवरही होणार आहे तुतिकोरीन प्रकल्पातील तांबे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकले जाते. हा प्रकल्प बंद पडल्याने देशावर लवकरच तांबे धातू आयात करण्याची वेळ येऊ शकते.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...