fbpx

येरवडा कारागृहात हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरवर जीवघेणा हल्ला

टीम महाराष्ट्र देशा : येरवडा कारागृहात खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगणाऱ्या हिंदू राष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. शाहरुख शेख या कैद्याने हा हल्ला केला.

तुषार हंबीर हिंदू राष्ट्र संघटनेचे संघटक असून हडपसर येथील मोहसीन शेख खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कोंढवा खून प्रकरणातील आरोपी शाहरुख शेख या कैद्याने कारागहातील शौचालयाच्या बाहेर तुषार हंबीर या कैद्याच्या डोक्यासह मानेवर खिळ्यांनी वार करुन त्याला गंभीर जखमी केले.

पोलिसांकडून आणि तुरुंग प्रशासानाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून तुरुंग प्रशासनाकडून बंदोबस्त वाढविण्यात आला.