भाजपने ‘मर्यादा पुरुषोत्तम’ बिरुदाला साजेसे वर्तन करावे – तुषार गांधी

पुणे – भाजपने सत्तेत येताना लोकांना विकासाची स्वप्न दाखवली, आश्वासनांचा पाऊस पाडला मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला त्यांनी लोकांना भाजप सत्तेत आल्यास रामराज्य येईल असे सांगितले होते मात्र. भाजपकडून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील रामराज्याचा हडताळ फसला गेल्याची टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली आहे.

bagdure

वकृत्वोत्तेजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे ‘सद्य परिस्थिती आणि महात्मा गांधी’ या विषयावरील पहिले पुष्प तुषार गांधी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. गांधी म्हणाले की, भाजपची महात्मा गांधींना ज्या प्रकारचे रामराज्य अपेक्षित होते त्याच्या अगदी विरुद्ध वाटचाल सुरू आहे. ज्या रामाचे नाव घेऊन सरकार सत्तेत आले, त्यांनी तरी ‘मर्यादा पुरुषोत्तम’ या रामाच्या बिरुदाला साजेसे वर्तन करावे. कर्नाटकातील सत्ता मिळविण्यासाठी ज्या प्रकारे घोडेबाजाराला उत्तेजन दिले गेले. ही परिस्थिती चिंताग्रस्त करते.

You might also like
Comments
Loading...