नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नुकताच पंजाबमध्ये अडवण्यात आला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधाना दिर्घायुष्य लाभावे यासाठी भाजप अध्यात्मीक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकमधील रामकुंडावरील बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती आणि महामृत्यूंजय मंत्रजाप केला.
यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Archarya Tushar Bhosale) यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. हरियाणातील पंचकुलाच्या मनसा देवी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायूसाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही हवन केले.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच 'महामृत्युंजय मंत्रजाप' करण्यात आला. pic.twitter.com/qXDtQKxlmK
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) January 7, 2022
याबाबत तुषार भोसले यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच ‘महामृत्युंजय मंत्रजाप’ करण्यात आला.’ अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<