कुर्डूवाडीत मराठा आरक्षणासाठी वाघ्या मुरळीचा गोंधळ

कुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चा माढा तालुक्या च्या वतीने कुर्डूवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन बोकडाची संभळ वाद्य वाजवत शहरातील प्रमुख रस्त्यावरुन मिरवणुक काढली. बोकडाला मुख्यमंत्री असे नाव देण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणविस यांच्या विरोधात मराठा समाजाच्या तीव्र घोषणाबाजी सुरु होती.

सकाळी दहा वाजता शहरातुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मराठ्यांचा हाजारोंचा ताफा गांधी चौक – मिठाई गल्ली – लक्ष्मी टाँकिज – नगरपरिषद समोरुन – पटेल चौक – मसोबा पार – पोस्ट आँफिस रोडवरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोकडाची प्रतिकात्मक संभळ वाद्य वाजवत यात्रा काढुन सरकार विरोधी घोषणा मराठा समाजाने दिल्या. यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येंने ऊपस्थित होता. अनेकांच्या हातात भगवे झेंडे , संभळवाद्य , तुनतुने घेऊन प्रचंड मोठी प्रभात यात्रा काढण्यात आली. तुमचं आमचं नातं काय ..जय जिजाऊ जय शिवराय , मराठ्यांना आरक्षण मिळालचं पाहिजे , कोण म्हणतं देत नाही …घेतल्याशिवाय राहत नाही , या फढणविस सरकारचं कारायचं काय ? खाली मुडकं वर पाय , अशा घोषणांनी परिसर दणानुन गेला होता.

या यात्रेचे नियोजन सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळाचे नियोजन करण्यात आल्याचे सागिंतले.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करुन इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता नौकरी व शिक्षणात 16 टक्के आरक्षण द्यावे या मागणीसाठी वाघ्या मुरऴीने देखील गोंधळ घावीत सरकारचे लक्ष वेदण्याचा प्रयत्न केला.

या लक्षवेधी आंदोलनासाठी संजय टोणपे, हर्षल बागल, मच्छिंद्र कदम, तुषार हाके, सौरभ भोसले, चंदु गवळी , संदिप भराटे, प्रशांत बागल, गणेश शिंदे, राजन गव्हाणे, सौरभ परबत, कृष्णा गवळी, ऊल्हास पाटिल , महेश वाळुकर , यांच्यासह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

यावेळी संजय पाटिल घाटणेकर, दादासाहेब साठे, बंडुनाना ढवळे, अरुण काकडे, सुरेष बागल, संजय गोरे , अप्पासाहेब ऊबाळे, हरीभाऊ बागल, सजंय लोंढे, वैभव मोरे, आबा गवळी, लक्ष्मण बागल, प्रमोद बागल, प्रनेश बागल, अंकुश बागल, आकाश लोंढे, समाधान दास, अतुल फरताडे, जितु गायकवाड, क्षितीज टोणपे , नवा कडबाने, ज्ञानेश्वर गरड, रमेश आबा बागल, सागर कौल्हे, अक्षय बागल, नामदेव ढेकळे, भराटे महाराज, बप्पा चव्हाण, सुहास सरडे, चेतन गोडसे, बालाजी पाटिल कल्याण बागल यांच्यासह या आंदोलनात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.

मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षण आंदोलनाला जाहिर पाठिंबा
मराठा आंदोलनाला यावेळी कुर्डूवाडी येथील मुस्लिम समाजाने जाहिर पाठिंबा देत आगामी काळात आॆदोलनात मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाज सक्रिय ऊभा राहिल . असे लेखी निवेदन दिले. यावेळी मक्का मशीद चे सदर वहिद शेख, जामे मशीद सदर नासर दालवाले, वाजीद कुरेशी, जमीर पठाण, शब्बीर चांद, आर्षद मुलाणी, दस्तगीर तांबोली, हमीद शिकलकर, शफी शेख, इक्बाल शिकलकर आदी ऊपस्थित होते.

-मुस्लिम समाजाचा पाठिंबा

-बोकडाला मुख्यमंत्री बनवुन अंतयात्रा

-घोषणानांनी परिसर दणाणुन गेला

युपीत विजेचे खांब,बस गाड्यानंतर हज हाऊसही भगवं केलं!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती द्या- मुख्यमंत्र्यांचे निर्देश