सौंदर्य खुलवणारी हळद

टीम महाराष्ट्र देशा : हळद रक्त शुद्ध करते म्हणूनच याने सुंदरता वाढते. जर चेहर्यावरील डाग जात नसतील तर हळदीचा पॅक तयार करून वापरू शकता. हळदीत आढळणारे एंटीसेप्टिक गुण डाग मिटवण्यात मदत करतात. पाहू हळदीचे काही गुणकारी फेस पॅक ज्याने डागही मिटतात आणि रंगही उजळतो.

1. पीठ व हळद एकत्र करून मध आणि दूध काही थेंब घालून मिक्स करावे. त्याचा एक पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावाव,पेस्ट लावण्या पूर्वी, साबणाने आपले तोंड स्वच्छ धुवा, नंतर ही पेस्ट आपला चेहऱ्यावर हलक्या हाताने घासा आणि १० मिनीटे तसच असुद्या आणि नंतर थोड्या कोहमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

2. हळद-दही स्क्रब : हा स्क्रब एक सूर्यामुळे झालेले टॅन आणि त्वचा साफ करण्यासाठी एक चांगला उपाय आहे. दिड चमचा हळद व1 चमचे दही एकत्र मिक्स करा. 15 मिनिटे आपला चेहऱ्यावर ही पेस्ट लावा आणि मग थंड पाण्याने धुवा. हळद, त्वचा साफ करते तर दही त्वचेला ओलावा देतो.

Rohan Deshmukh

3. हळद, चंदन आणि दूध: एका पातेल्यात, हळद, चंदन याची पेस्ट करा आणि त्यात २ ते ३ चमचे दुध टाका आणि मिश्रन तयार करा.तयार केलेले मिश्रन चेहर्या वर लाऊन २ ते ३ मीनट मसाज करा. १० मिनिटापर्यंत लेप चेहऱ्यावर तसच ठेवा आणि मग थंड्या पाण्यानी धुवून घ्या.

4. हळद मध पेस्ट: हे पेस्ट बनवण्या करीता, हळद आणि मधाचा पेस्ट मध्ये २ ते ३ थेंब गुलाबजल चे टाका. आणि मग ते चेहरा आणि मानेला लाऊन घ्या. हे पेस्ट आठवड्यातून २ ते ३ दा लावा यामुळे चेहऱ्यावरील डाग व सुरकुत्या जातील.

चेहरा धुताना काय काळजी घ्यावी

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...