Share

Sushama Andhare । “तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला”; सुषमा अंधारे यांचा भाजपला खोचक टोला

पुणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलत असताना  शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही नेत्यांनी नरेंद्र मोदींची नक्कल देखील केली असल्याचं समजतंय. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात या तिघांसह एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रीया दिली आहे. कलम 153 अनुसार दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण होणे असा आहे, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 9 तारखेला माझी सभा झाली. आज पर्यंत कुठलीही दंगल झाली नाही, मग तुम्ही कसं म्हणू शकता हे चिथवणीखोर वक्तव्य आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. त्यांना सोडून दिलं. आमदार प्रकाश सुर्वे बोलतात हातपाय तोडतो. हे उघडपणे हातपाय तोडण्याची भाषा करता हे चितावणीखोर वक्तव्य नाही का? तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला” ऐसा कैसे चलेगा दादा? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी भाजपला टोला लगावला आहे. शिंदे गट सर्वांनाच त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या प्रवेशाआधी त्यांचे काही लोक मलाही संपर्क करत होते. त्यांनी प्रयत्न करणे हे स्वाभाविक आहे. साम दाम दंड भेद अशी सर्व नीती शिंदे आणि त्यांचे सहकारी वापरत असल्याचं सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यावर माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, सत्य मांडणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्हाला मान्य आहे, आणि तो आम्ही करणारच सुषमा अंधारे म्हणाल्या. ज्यादिवशी चिन्ह गोठवण्याची बातमी आली त्यादिवशी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात झाली. त्यामुळे ठाण्यात झालेली गर्दी ही विरोधकांच्या डोळ्यात खुपली असेल, मला नोटीस आली तर पोलीस स्टेशनला हजर होईन. कायदा माझ्या बापानं लिहिला आहे. त्यामुळे त्याचा आदर मी करणार, देखील त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

पुणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी बोलत असताना  शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. काही …

पुढे वाचा

Maharashtra Politics Pune

Join WhatsApp

Join Now