आरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म

टीम महाराष्ट्र देशा : तुळस या वनस्पतीला हिंदू समाजात मानाचे स्थान आहे.तुळस ही मांगल्यतेचे, पावित्र्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. प्रत्येक घरोघरी तुळशी वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच.विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावतात. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.

Loading...

तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे.

किडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, तो मधासोबत 1 महिना नियमित सेवन करा. यामुळे स्टोन मुत्राच्या मार्गाने बाहेर निघुन जाईल.

थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील, तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.

तुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा – एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा.

टॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप लावल्याने बरे वाटते.

विंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.
रोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात.

तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.

हे उपाय करून तुम्ही महिन्याभरात चष्म्याचा नंबर कमी करु शकता

इंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.

काय आहेत कारल्याचे फायदे?Loading…


Loading…

Loading...