fbpx

तुळजापूर : विकास कामांवरुन आघाडी भाजपात राजकारण पेटले !

तुळजापूर- लोकसभा विधानसभा निवडणूक तोंडावर होत असलेल्या तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुध्द भाजपा यांच्यात राजकारण पेटले आहे.

तुळजापूर नगरपरिषदच्या वतीने तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत दोन सिमेंट रस्ते व सभागृह या विकास कामांचा उदघाटनासाठी काँग्रेसचे आ.मधुकर चव्हाण व राष्ट्रवादीकाँग्रेसचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेताच भाजपाने यात राजकारण करीत असल्याचा आरोप करुन प्रोटोकाँल प्रमाणे भाजपा प्रदेश सरचिटणीस, भाजपा आ.सुजितसिंह ठाकुर यांना डावल्याचा आरोप करुन भाजपाने कार्यक्रम स्थळी काळे झेंडे दाखवुन याचा जाहीर निषेथ केला आहे.

या निषेधाचा समाचार घेताना आ.मधुकर चव्हाण म्हणाले की,  या सरकारने गेली साडेचार वर्षात याचा सत्ता काळात किती निधी दिला याचे उत्तर द्यावे व भाजपा सरकार फक्त घोषणा करतात पण कृती शुन्य असते असा पलटवार केला.

यावेळी राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी मागील निवडणूक प्रचारा दरम्यान तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गावर आणणार असे आश्वासन दिले. माञ याची घोषणा साडेचार वर्षानंतर निवडणूक तोंडावर रेल्वेची घोषणा केली. रामदरा तलावात पाणी आणणार असल्याचे सातत्याने सांगितले पण ना रेल्वे ना पाणी आले त्यामुळे हे सरकार घोषणाबाज सरकार असल्याचा पलटवार राष्ट्रवादीने भाजपवर केला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकमेंकाचे तोंड न पाहणारे कांँग्रेस- राष्ट्रवादी-काँग्रेस माञ निवडणूक तोंडावर ऐकञ आल्याचे दिसले, तर उलट भाजपाचा मिञ पक्ष असणारा शिवसेना या वादापासून दूर राहिलेला दिसला. .