तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग : ९५३ कोटींच्या प्रकल्पाला फक्त १ कोटी निधी

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०/०७/२०१८ मंजूर केला होता. त्यानंतर नरेंद्र मोदींनी सोलापूर येथील जाहीर सांगितले होते. या रेल्वेच्या मंजुरीमुळे सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद यासह या परिसरातील जनता खुश आहे.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे दुपार ४:०० वाजता होत आहे. हे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री पियुष गोयल, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उपस्थित होत आहेत.

Loading...

सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर यासाठी पहिल्या टप्प्यात फक्त १ कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सर्वस्तरातून टीका होताना दिसत आहे. तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर १ कोटी निधी देऊन जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप सध्या सर्वस्तरातून होताना दिसत आहे.

तर सोशियाल मीडियावरून देखील यांची टिंगल उडवीली जात आहे. ‘रेल्वे मार्ग सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद आणि उद्घाटन मुंबईला’, ‘९५३ कोटींचा प्रकल्प आणि फक्त १ कोटी निधी’, ‘रेल्वेचा रूळ पडणार कुठं , तुम्ही उदघाटन करताय कुठं?’ तर कोणी म्हणते आहे की, ‘गेली साडेचार वर्ष खासदार साहेब तुम्ही हितात कुठे?’

तर खा.संभाजी राजेचे स्वीयसहायक तुळजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले योगेश केदार यांनी अपरिपक्व राजकारण म्हणत विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर निशाना साधला आहे.

त्यांनी फेसबुकला पोस्ट लिहून म्हटले आहे की,

“अपरिपक्व राजकारण!!!!
सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे…..
काम कुणामुळं का होईना श्रेय तुम्हीच घ्या सर!
उदघाटन तुमच्याच हस्ते होऊ द्या.पण, उदघाटन मुंबईतून का करताय? हे हास्यास्पद नाही का ?
रेल्वेचा रूळ पडणार कुठं , तुम्ही उदघाटन करताय कुठं?
पासपोर्ट कार्यालय आणलं आम्ही अन उदघाटन केला तुम्ही , श्रेय घेतलं तुम्ही , आम्हाला त्याचं काही वाईट नाही वाटलं. आमची तशी इच्छा सुद्धा नव्हती. आम्ही जे काही केलं ते जिल्ह्यासाठी आमच्या वैयक्तिक लाभासाठी नाही. रेल्वेचंही तुम्हीच घ्या श्रेय ! पण जिल्ह्याचं हसू करू नका देशभरात….
पहिल्यांदाच असं घडतंय , एखाद्या प्रकल्पाकरीता भूमी नेमकी कुठून मिळणार हेच निश्चित नाही अजून आणि तुम्ही भूमिपूजन करताय ? बर , सोलापूर सोडा उस्मानाबाद जिल्ह्यात होणाऱ्या मार्गावर कुठेही , एखादा दगड पुजून , नारळ वाढवायचा होता?तुमचं असलेलं नसलेलं सगळं वजन वापरून एखाद्या मंत्र्याला आणायचा होता जिल्ह्यात. मग आम्ही मानलं असतं……
मुंबई कुठं ! उस्मानाबाद कुठं!????
तुमची खरी मागणी उमरग्यामधून रेल्वे न्यायची होती. ती का नाही पूर्ण झाली? हा मोठा आणि वजनाचा प्रश्न आहे….
असल्या घाईगडबडीच्या राजकारणाचा हा पकल्प बळी जाऊ नये हीच तळमळ….”

या मार्गामुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे 2018-19च्या नियोजनात नव्या रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आला आहे.सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाऱ्या या 80 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती