तुळजापूर- अनाधिकृत दगडखदान स्टोनक्रेशनवर कारवाईची मागणी

तुळजापूर- तालुक्यातील मोर्डा शिवारातील अनाधिकृत स्टोन क्रेशर व दगड खाणीमुळे जमिन नापीक होत आहे. यामुळे जनावरे व माणसांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने या प्रकरणी सविस्तर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन केली आहे.

या प्रकारामुळे तुळजापूर तालुक्यातील अनाधिकृत स्टोनक्रेशर प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतीत तहसिलदार यांना नागनाथ शेंबडे यांनी निवेदन देऊन अशी मागणी केली आहे. तुळजापूर मोर्डा रस्त्यावर गटनंबर 75 मध्ये गेली अनेक वर्षापासुन अनाधिकृत स्टोन क्रेशर दगड खदाण चालु आहे.

यामुळे शेती कसणे शक्य होत नसल्याने शेती नापीक ठेवावी लागत आहे. जनावरे माणसांचा जीवाला धोका असल्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकारी यांना तहसिलदार यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या