तुळजापूर : पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या फळबागा पाण्याअभावी जात आहेत जळुन

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली असुन, तालुक्यातील 2132 हेक्टरक्षेञावरील  फळबागा जळण्यास प्रारंभ झाला आहे.पोटच्या लेकरा प्रमाणे जपलेल्या फळबागा पाण्याअभावी जळुन जात असल्याचे पाहुन शेतकरी हावालदिल होत आहे.

जमिनीत पाणीच शिल्लक नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी फळबागांवर कु-हाड चालवण्यास आरंभ केला आहे. तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 1002.56 हेक्टर क्षेञावर द्राक्ष लागवड झाली असुन त्याखालोखाल 643 हेक्टर क्षेत्रात आंबा दाळींब 129 हेक्टर चिंच 94.50 पेरु 29.40 कागदी लिंबू 88.8चिकु 54.73 मोसंबी 8 सिताफळ 17 रामफळ 1.50 आवळा 25.10 केळी 11.40  बोर 15.20 पपई 12.30 नारळ 80 असे ऐकुण 2132 हेक्टर क्षेञावर फळबाग लागवड आहे

द्राक्ष-आंबा या सारख्या फळबागा जगविण्यासाठी शेतकरी पाण्याची टँकर विकत घेवुन जगविण्याची केवलवाणी धडपड करीत आहेत.माञ टँकरने पाणी देणे अनेकांना शक्य नसल्याने आता करावे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. निवडणूक मौसम सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासन व राजकिय पक्ष दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांना अतिशय बुरे दिन समोर उभे टाकले आहेत.

टँकरच्या पाण्याला लाखो रुपये खर्च करुन लाखमोलाची बागा वाचविण्याची धडपड मोजके शेतकरी करीत आहेत.गावोगावी विहीर, बोअर, तलाव कुपनलिका यांनी तळ गाठला आहे.त्यामुळे दुष्काळाची भीषणता वाढली आहे. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. तालुक्यात 2132 हेक्टर रक्षेत्रात फळबाग असुन झाडांना पाणी नसल्याने ठिकठिकाणच्या बागा वाळुन चालल्या आहेत.