fbpx

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे?

तुळजापूर : तुळजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरु असुन या पार्श्वभूमीवर भाजपा इछुकांच्या संखेत मोठी वाढ झाली आहे .

आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर काँग्रेस भाजपा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. दुसरीकडे शिवसेना गोटात मात्र शांततेचे वातावरण पाहवयास मिळत आहे. भाजपा-शिवसेन युती होणार असे गृहीत धरुन भाजपा जिल्हयात आगामी निवडणुकीची राजकीय व्युहू रचना आखत आहेत.

लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे आहे. सध्यातरी भूम-परांडा रासप, कळंब, उमरगा-लोहारा सेनेकडे असल्याने तुळजापूर विधानसभा मतदार संघ भाजपाकडे घेण्यासाठी जोरादार हालचाली भाजपच्या प्रादेशिक पातळीवरुन सुरु असल्याची माहिती मिळत आहे.यासाठी केंद्रीय मंञी नितीन गडकरी आणि मुखमंञी यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त सध्यातरी मिळत आहे.मुखमञी देवेंद्र फडणवीस यांनी सीएम चषकच्या माध्यमातून राज्यातील वीस युवा नेत्यांकडे ही जबाबदार सोपवली आहे. या वीस नेत्यांना मुखंमञी देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाला बोलवून त्यांच्याशी विधानसभेची चर्चा करुन जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुळजापूर विधानसभेसाठी इछुकांची मोठी गर्दी झाली आहे.

तुळजापूर तालुक्यात भाजपने सिमेंट बाकडे सीएम चषकच्या माध्यमातून मतदारांशी तालुक्याततुन संपर्क साधत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना ही तुळजापूर तालुक्यात अपेक्षित अशी सक्रीय दिसत नाही. तुळजापूर तालुक्यात शिवसेनेत मरगळ आल्याचे दिसत आहे .

1 Comment

Click here to post a comment