तुळजाभवानी मंदीर संस्थानतर्फे जीवनावश्यक वस्तुंचे कीट व वस्ञे पूरग्रस्त भागाकडे रवाना

blank

तुळजापूर- गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे राज्यभरातून या भागासाठी मदत पोहोचवली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने पूर ग्रस्तांना पंचवीस लाख रुपये रोख व पंचवीस लाख रुपयाचे जीवनावश्यक वस्तुचे किट देण्यात येणार असुन हे किट मंगळवार दि १२ रोजी राञी जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंढे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे नगराध्यक्ष बापुसाहेब कणे तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते तीन मदत वाहनांचे पुजन करुन ही मदत उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे हे घेवून रवाना झाले. यावेळी धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले उपस्थितीत होते.

सुमारे तेरा लाख रुपयांंचे जीवनावश्यक साहित्य त्यात पाच किलो आटा साखर टुथपेस्ट ब्रश साबण दोन किलो तूर दाळ तांदुळ यासह अनेक जीवनाश्यक वस्तु व दोन हजार पाणी बाँटल बाँक्स अकराशे साड्या त्यात सहावार नऊवार साड्यांचा समावैश असालेले कीट वाहनांतुन पाठवण्यात आले. तसेच उर्वरीत मदत लवकर च पाठवली जाणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली.

दरम्यान, शिर्डी संस्थाननेही पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. तसेच डॉक्टरांची टीम औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्विट करून दिली आहे. तर शिर्डीच्या वतीने राज्यातील पुरग्रस्तांच्यामदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी न्यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार असल्याची माहिती संस्थानच्या अध्यक्षांनी दिली.