महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या सिंहासनावर ११ हजार हापूस आंब्याची सजावट, रूप पाहून व्हाल धन्य

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेस पुणे येथील भक्ताने देवीच्या वारा दिवशी मंगळवार दि २१ रोजी श्रीतुळजाभवानी मातेच्या गर्भगृहात ११ हजार एकशे आकरा एवढ्या रत्नागिरीच्या हापुस आंब्याची मोगरा फुलाची आर्कर्षक अशी सजावट केली होती.
या सजावटमुळे देवीचे गर्भगृह मोगरा व हापुस आंब्याच्या सुगंधाने दारवळुन गेले होते भाविक रांगेतुन सिंह गाभाऱ्यात आला की देवीचे हापुस आंबा व मोगरा फुलांतील रुप पाहुन धन्य होत होता.

याचबरोबर राजे शहाजी महाद्वार, राजमाता जिजाऊ,दरावाजा होम कुंड, यासह मंदिर परिसरात आंबा व फुलांची आकर्षक सजावट केली होती.

तिर्थक्षेञ तुळजापूरच्या इतिहासात प्रथमच ऐवड्या मोठ्या हापुस आंबा,मोगरा फुलांची सजावट होत आहे. ही फलफुलरंगावली सेवा नगर येथील पलंगय पालखीचे देवीचे मानकरी जितु भगत यांनी केली असुन ते सध्या पुणे येथे व्यवसाय करीत आहेत.

इतर तिर्थक्षेञी आंबा सजावट होते ही सेवा येथे का होतं नाही म्हणत आईची सेवा म्हणून श्रध्देपोटी मी ही सेवा केली आहे. मला ही सेवा करण्याचे पहिल्यांदा भाग्य मिळाल्या बद्दल मी स्वताला धन्य समजतो. असे भगत यांनी म्हंटले आहे.