तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

tushibag

पुण्यातला मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे.  तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती आहे. सुमारे १३ फुट उंचीची ही गणेशमूर्ती अत्यंत आकर्षक आणि मनोहारी आहे. या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभूषणे चढविण्यात आली आहेत.