तुळजापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वाढविला जनसंपर्क, विरोधक संभ्रमात

BJP

तुळजापूर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेला तुळजापूर विधानसभा मतदार संघ आघाडी कडुन कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा भाजपाच्या वाट्याला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा मंञ्याचे तिर्थक्षेञ तुळजापूरी येणे-जाणे वाढल्याचे समोर येत आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर व भूम परांडा हे दोन मतदारसंघ भाजपा वाट्याला येण्याचा दावा जिल्हाअध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूर येथे भाजपने कार्यक्रमाचा धडाका सुरु आहे. दरम्यान,कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांच्याविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

तुळजापूर तालुका विधानसभा मतदार संघा बाबतीत मुखमंञी देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे निर्णय घेतील असे शिवसेना नेते माजी खा चंद्रकांत खैरे यांनी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पञकारांनी विचारलेल्या प्रश्नांस उत्तर देताना म्हणाले ,तर भाजपा नेते आ. ऐकनाथ खडसे हे देवीदर्शनाला आले असता व जिल्हाअध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तुळजापूर येथील कार्यक्रमात लोकसभा मतदार संघ शिवसेनेला गेला असुन याची पोकळी कसर जिल्हयातील जास्तीत जास्त मतदार संघ भाजपा कडे घेवुन कसर भरुन काढली जाईल आशी ग्वाही दिल्याने या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हा मतदार संघ भाजपा चा वाट्याला येण्याची मोठी शक्यता आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजपा ने कंबर कसली आसुन भाजपा मंञी ,खासदार, आमदार यांचा वावर वाढला आहे.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजपने तालुक्यात जनसंपर्क वाढवला आहे. गुरुवार दि18 रोजी भाजपा नेते मंञी तिर्थक्षेञ तुळजापूर दौऱ्यावर येणार असुन या दौऱ्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस चे अनेक पदाधिकारी भाजपा त प्रवेश करणार असल्याचे वृत्त असुन या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या गोटात शांततेचे वातावरण पसरले आहे.