तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी !

blank

तुळजापूर- श्रीतुळजा भवानी मंदीर संस्थानच्या वतीने महाराष्ट्रात सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दिला जाणारा पण मागील पाच वर्षांपासून रखडलेला तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा पुनश्च सुरु करण्याची मागणी होत आहे.

श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थान चा वतीने श्रीतुळजाभवानी शाकंभरी नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध क्षेत्रात सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना तुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार देवून स्ञी शक्ती देवता दारी गौरवुन सन्मानीत करण्यात येत होते याचे स्वरुप श्रीतुळजाभवानी मातेस नेसवलेला शालु महावस्ञ रोख रक्कम ऐकावन्न हजार रुपये व मान पञ असे होते.

2010सालापासून हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला पहिला पुरस्कार समाजसेविका साधनाताई बाबा आमटे ना तर दुसरा पुरस्कार 2011ला आंतरराष्ट्रीय धावपटू सावरपाडा ऐक्सप्रेस कविता राऊत यांना दिला या पुरस्कार प्राप्त महिलांनी हा आमचा सर्वाकृष्ट पुरस्कार असेल व राहील अशी प्रतिक्रिया जाहीर रित्या दिली होती. तिसरा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेञी सुलोचना यांना जाहीर केला होता. त्यांनी हा पुरस्कार स्विकारण्यास येण्यासाठी तात्कालिन जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांना समंती दिली होती.माञ काही मंडळी नी या सोहळ्यास दुष्काळाच्या नावाखाली आक्षेप घेतल्याने मंदीर संस्थान ने तो स्थागित ठेवला आज पाच वर्षापासून हा पुरस्कार सोहळा रखडला आहे.हा पुरस्कार सुरु होण्यासाठी महायुती सत्ता काळात ही प्रयत्न केले गेले नाहीत त्यामुळे मोठी नाराजी  वाढली आहे.

या पुरस्कार ने राज्यात अल्पावधीतच मानाचे स्थान पटकावले असल्याने  तो पुनश्च सुरु करुन देवीदारी महिलांच्या सन्मान करण्याची प्रथा परंपरा सुरु करण्याची मागणी भाविकांसह समस्त महिला वर्गाकडून केली जात आहे. पुरुषांना दिला जाणारा पुरस्कार असा रखडवला गेला असता का अशा संतप्त प्रतिक्रिया महिला प्रतिनिधी म्हणून व्यक्त होत आहेत.आघाडी सत्ता काळात बंद पडलेला तुळजाई पुरस्कार महायुती काळात तरी सुरु व्हावा अशी मागणी होत आहे.

अध्यक्ष व प्रशासकीय आधिकारी पदावर असल्याने पुरस्कार सुरु होण्याची आशा!
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्षपदी दिपा मुधोळ मुंढे व प्रशासकीय अधिकारी पदी तहसिलदार तथा विश्वस्त योगिता कोल्हे या दोन्ही पदावर महिला असल्याने हा पुरस्कार पुनश्च सुरु होवून स्ञीशक्ति देवता दारी महिलांची सन्मान करण्याची रखडलेली परंपरा सुरु होईल अशी आशा महिला वर्गातुन व्यक्त केली जात आहे.