fbpx

श्रीतुळजाभवानी च्या शाकंभरी नवराञोत्सवास सोमवार पासुन आरंभ !

तुळजापूर : महाराष्ट्राची आराध्यदैवत आई तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवराञोत्सव सोमवार दि.१४  दुर्गाष्टमी पासुन श्रीगणेश ओवरीत दुपारी १२ वा घटस्थापना करण्यात येवुन आरंभ होणार आहे.जलयाञा सोहळा शुक्रवार दि.१८  जानेवारी ला आहे.

प्रत्येक वर्षी पौष महिन्यात (डिसेंबर/जानेवारी) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते. शारदीय नवरात्राच्या सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही, असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्या करिता तुळजापूरला येतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवस्थान संस्थानाच्या वतीने नाटक, संगीत जलसा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

श्री तुळजाभवानीचे शाकंभरी नवराञातील धार्मिक विधी पुढीलप्रमाणे

  • मित्ती पौष शु.८ सोमवार दि१४ रोजी श्री तुळजाभवानी मातेची पहाटे सिहांसनावर प्रतिष्ठापना तसेच ठीक दुपारी १२-०० वाजता श्रीगणेश ओवरीत शाकंबरी देवी प्रतिमा समोर घटस्थापना शाकंभरी देवीची मंगल आरती रात्री ७:०० वाजता , रात्री छबिना.
  • मित्ती पौष शु. ९ मंगळवार दि १५ रोजी श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा , व रात्री छबिना
  • मित्ती पौष शु. १० बुधवार दि १६ रोजी श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजानंतर रथ अलंकार महापूजा रात्री छबिना .
  • मित्ती पौष शु११ गुरूवारदि १७ रोजी मुरली अलंकार महापूजा, रात्री छबिना .
  • मित्ती पौष शु. १२ शुक्रवार दि १८रोजी सकाळी ७:०० वाजता पापनाश तिर्थकुंडा पासुन जलयात्रा आरंभ ती संपल्यानंतर मंदीर संस्थानच्यावतीने ,सुवासानीची ओटी भरणे श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा ,शेषशाही अलंकार महापुजा, रात्री छबिना
  • मित्ती पौष शु १३ शनिवारदि १९रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, व रात्री छबिना
  • मित्ती पौष शु १४ रविवार दि २० रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, रात्री ७:०० वाजता व रात्री छबिना .
  • मित्ती पौष शु. १५ शके १९४० सोमवार दि २१रोजी शाकंभरी पोर्णिमा नित्योपचार पुजा, दुपारी १२ वाजता , घटोत्थापना पुर्णाहुती व रात्री छबिना ,जोगवा .