तुकाराम मुंढेचा कॉंग्रेसला दणका

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी पीएमपीलच्या १५८ कर्मचार्यांना बडतर्फ केले होते. त्यानंतर मुंढे राहतात त्या घराचे भाडे लाखांच्या घरात असून त्याचा भार पीएमपीलवर आहे. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच काही दिवसांपूर्वी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर आता पुन्हा धडाकेबाज निर्णय घेत काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच ‘पीएमपी’च्या भांडार विभागासमोरील इमारतीत असलेले राष्ट्रवादी कामगार युनियनचे कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. मात्र दिलेल्या नोटीस च्या मुदतीपूर्वी तीन महिने आधीच कार्यालय ताब्यात घेण्यात आले. याला संघटनेच्या वतीने तीव्र विरोधही करण्यात आला होता. हीच वेळ आता कॉंग्रेस प्रणीत पीएमपी कामगार संघटनेवर (इंटक) आली आहे. पीएमपी प्रशासनाने सोमवारी इंटकला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

You might also like
Comments
Loading...