मुंढेंचा दणका ; 158 बसचालकांना बडतर्फ करत, दाखवला घरचा रस्ता

tukaram-mundhe-

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या बसचालकांना दणका दिला असून या बेजाबदार चालकांवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 158 बसचालकांना बडतर्फ करत, घरचा रस्ता दाखवला आहे.

पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक होण्यापूर्वी तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. पुण्यात आल्यापासूनही त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली.सध्या पीएमपीएमएलमधीलही त्यांच्या कामाचा धडाका नेहमीच चर्चेत असतो.आता सतत गैरहजर राहणाऱ्या बसचालकांना मुंडे यांनी घरचा रस्ता दाखवला असून या धडक कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...