पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसशिवायच?

Tukaram-mundhe pmpml

पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांचा बोनसचा वाद अजून वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत कारण कामगार न्यायालयाच्या निर्णयानंतरही बोनस न देण्याच्या आपल्या हट्टावर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकारम मुंढे ठाम आहेत. पीएमपी तोट्यात असल्याचे कारण देत बोनस देण्याचं मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला आहे.

पीएमपी तोट्यात असून, कर्जबाजारी असल्याने कर्मचा-यांना यंदा सानुग्रह अनुदान व बोनस देण्यात येणार नसल्याचे मुंढे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.त्यामुळे महामंडळातील कर्मचारी संघटनांनी औद्योगीक न्यायलयात धाव घेतली होती. न्यायालयाचे सभासद एस. व्ही. सुर्यवंशी यांनी सर्व कर्मचा-यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व १२ हजार रुपये बक्षीस देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे पीएमपी प्रशासन नक्की काय भूमिका घेते याकडे कर्मचा-यांचे लक्ष लागून राहिले होते. पण न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुंढे यांनी आपली भुमिका ठेवल्यामुळे  पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. मुंढे यांच्या या निर्णयानंतर पीएमपीचे कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

.