फडणवीसांची कोंडी करण्यासाठी तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या महानगरपालिका आयुक्तपदी बदली

tukaram-mundhe-

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष कामाच्या पद्धतीमुळे कायम चर्चेत आणि वादात असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नाशिकमध्ये एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक असलेल्या मुंढेंची आता नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारने त्याची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. आता महाविकास आघाडी सरकारने भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मुंढेंसारख्या शिस्तप्रिय आणि कडक अधिकाऱ्याची बदली केल्यामुळे आता भाजपसाठी हि अडचणीची बाब ठरणार. अशी चर्चा सुरु झाली आहे.

Loading...

दरम्यान, यापूर्वी नवी मुंबई आणि नाशिकचे आयुक्त असताना तुकाराम मुंढेंच्या कारभाराला कंटाळून तिथल्या लोकप्रतिनिधिंनी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याआधी पिंपरी-चिंचवड आणि बीडचे आयुक्त असताना देखील त्यांच्या कडक शिस्तीचा फटका लोकप्रतिनिधींना बसला होता. त्यामुळे आता तुकाराम मुंढेच्या नागपूरच्या आयुक्तपदावर बदलीच्या निर्णयावर भाजप काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात