तुकाराम मुंढेंचा नाशिक महानगरपालिकेच्या 4 अधिकाऱ्यांना दणका

टीम महाराष्ट्र देशा- अनियमत कारभाराचे आरोप असणाऱ्या चार अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे यांनी अल्टिमेटम देत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. निर्भीड कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी अवघ्या महिन्याभरातच नाशिक महानगरपालिकेतील सुस्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडबडून जागे केले आहे. या अधिकाऱ्यांना 10 दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत.

दरम्यान, आयुक्तांकडून गेल्या काही दिवसात घेतल्या गेलेल्या निर्णयाविरुद्ध मान्यताप्राप्त म्युनिसिपल कर्मचारी-कामगार संघटना एकवटल्या असून त्याविरूद्ध एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने ४७८ सफाई कामगारांच्या बदल्या केल्यानंतर सर्व संघटनांनी एकत्र येत त्याविरूद्ध आवाज उठविल्याने प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यावे लागले आणि १६८ महिला सफाई कर्मचा-यांच्या बदल्या रद्द कराव्या लागल्या होत्या.

You might also like
Comments
Loading...