मुंढेंनी कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला ८ लाखांचा दंड ठोठावून टाकले काळ्या यादीत

tukaram mundhe

नागपूर : आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी आणि शिस्तीसाठी ओळखले जाणारे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहरातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या जे. पी. इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठेकेदाराला एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना एकूण कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख ११ हजार ९६५ रुपये दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान,सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा ३ मधील रस्ता क्रमांक ३१ म्हणजेचे एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्त्याचे पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाण आवश्यक ग्रेडनुसार नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आढळून आले. प्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे काँक्रीटीकरण पक्के होण्याच्या आधीच लावण्यात सुरुवात केली असल्याचे निदर्शनास आले होते. जे. पी. इंटरप्रायजेसने केलेल्या कामाच्या मोबदल्यात मनपाने ठेकेदाराला ३२ कोटी ४७ लाख ८६ हजार १५१ रुपये दिलेले आहेत. मात्र, कामात त्रुटी आढळल्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकत कार्यादेशाच्या रकमेवर ०.२५ टक्के दंड ठोठावला आहे.

Loading...

दरम्यान,नागपुरातील गुंड आणि गँगस्टर संतोष आंबेकर याच्या इतवारी परिसरातील अनधिकृत बंगला पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे देखील मुंढे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. नागपूर मनपा अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. ज्या गुंडाची नागपुरात दहशत होती त्याचा बंगला पाडण्यात येणार असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, दुसरीकडे तुकाराम मुंढे थोडाही कामचुकारपणा खपवून घेत नाहीत. रुजू झाले तेव्हापासूनच त्यांनी कर्मचाऱ्यांना तंबी देणे सुरू केले. काहींना निलंबित केले. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. तर कार्यालयात फॉर्मल ड्रेस, क्लिन शेव्ह घालून येणे बंधनकारक केले आहे. जीन्स पॅंट व टी शर्ट घालून येण्यास बंदी घातली आहे. जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमांनाही येणे बंधनकारक केले आहे. तसेच कपडे घालायची हौस बाहेर भागवा, मात्र कार्यालयातून येताना फॉर्मल ड्रेसच घाला. तुमचे समाजातील स्टेट्स जीन्स घातली म्हणून नाही तर महापालिकेचे कर्मचारी म्हणून असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश