अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा

tukaram-mundhe-

नागपूर : आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी आणि शिस्तीसाठी ओळखले जाणारे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नागपुरातील गुंड आणि गँगस्टर संतोष आंबेकर याच्या इतवारी परिसरातील अनधिकृत बंगला पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गँगस्टर संतोष आंबेकरचा आलिशान असणारा अनधिकृत बंगला पाडण्यास आज दुपारी सुरुवात झाली. नागपूर मनपा अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. ज्या गुंडाची नागपुरात दहशत होती त्याचा बंगला पाडण्यात येणार असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

झी २४ तासने दिलेल्या वृत्तानुसार,आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्विकारल्यानंतर ही कारवाई सुरु झाली.ऑक्टोबर महिन्यापासून पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात कारवाई करत १२ ऑक्टोबरला त्याला अटक केली होती.

त्यानंतर त्याच्या विरोधात आतापर्यंत मारहाण, खंडणी, बलात्कार, लुबाडणूक असे वेगवेगळे १८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी संतोष आंबेकर विरोधात मकोका अंतर्गत ही कारवाई करत त्याचे साम्राज्याचा उद्ध्वस्त करणे सुरू केले होते. तेव्हापासून त्याचा अनधिकृत बांधकाम पाडला जाईल, अशी माहिती होती.