तुकाराम मुंडेंचा दणका ; कामचुकार ३ कर्मचारी निलंबित !

नाशिक : आपल्या धडाकेबाज निर्णयाने कायम चर्चेत असणारे IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे सध्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. येथे सुद्धा त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. आता आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी महापालिकेचे ३ कर्मचारी निलंबित केले आहेत. तर ७ कर्मचाऱ्यांची वेतनवाढ सुद्धा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी रोखली आहे.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

दरम्यान, तुकाराम मुंडे यानी मोकळ्या जागांसह, रहिवासी क्षेत्रातील शेतीवर करवाढीचा आसुड त्यांनी ओढला. शेतीवरचा कर समर्थनीय नाही. त्यामुळे प्रचंड टिका झाली. त्याबाबत आंदोलनही सुरु आहे. त्याचबरोबर आयुक्त मुंडे यांनी नागरिकांच्या तब्बल ९४ टक्के तक्रारींचा निपटारा केला आहे. याद्वारे ५३७५ तक्रारीपैकी ५०७९ तक्रारी सोडवल्या आहेत.

Shivjal