तुकाराम मुंढे यांना उपस्थित राहणे बंधनकारक करावे

Tukaram-mundhe pmpml

टीम महाराष्ट्र देशा – : पीएमपीएमएलच्या नियोजनासाठी विशेष सभेचे आयोजन करावे आणि या सभेला पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना उपस्थित राहणे बंधनकारक करावे असा प्रस्ताव स्थायी समिती सदस्यांनी मंडल होता. त्याला मान्यता देण्यात आली आहे.पास दरवाढ, कर्मचाऱ्याचा बोनस या प्रकरणावरून पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि पालिका पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मुंढे पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेत नसल्याची तक्रार पदधिकाऱ्याकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलमध्ये असलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्य सभेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव सभासदांनी स्थायी समितीला दिला होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या प्रस्तावात तुकाराम मुंढे आणि पीएमपीएमएल अधिकाऱ्यांनी या बैठकीला हजर राहणे बंधनकारक करावे असे नमूद करण्यात आले आहे.Loading…


Loading…

Loading...