तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

टीम महाराष्ट्र देशा:शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या तुकाराम मुंढेंची अवघ्या महिन्याभरातच बदली करण्यात आली असून आता एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची यापूर्वी 22 नोव्हेंबर 2018 रोजी नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे त्यांची वर्णी लावण्यात आली होती. मुंडे यांना मंत्रालयातील हे पद नको होते तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनाही मुंडे यांच्यासारखा अधिकारी नको होता अशी चर्चा होती.गेल्या बारा वर्षात बदली होण्याची तेरावी वेळ आहे.

1 Comment

Click here to post a comment