पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची धुरा तुकाराम मुंढे यांच्याकडे 

रखडलेले प्रश्न मार्गी लागणार का ?

पुणे-पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) च्या अध्यक्षपदी तुकाम मुंढे यांची राज्य शासनाने नियुक्ती करण्यात आली आहे. हा पदभार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे होता.

राज्य शासनाने प्रथमच प्राधिकरण अध्यक्षपदी एका स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक  केली आहे.तुकाराम मुंढे यांच्याकडे पीएमपीएमपीएमएलचे संचालकपद आहे त्या बरोबरच त्यांच्याकडे आता प्राधिकरणाचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे. २००४ पासून प्राधिकारणाच्या अध्यक्षपदाचा पदभार हा  विभागीय आयुक्तांकडे होता.मुंढे यांच्या नेमणुकीमुळे प्राधिकरणाचे रखडलेले गृहप्रकल्प, भूसंपादनाचा प्रश्न, झोपडपट्टी अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, रिकामे भूखंड विकसीत करण्याचे आव्हान असे अनेक प्रश्न आता मार्गी लागतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

You might also like
Comments
Loading...