fbpx

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, भिडे गुरुजींनी घेतले दर्शन

टीम महाराष्ट्र देशा : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले आहे. लाखो वारकऱ्यांनी पुणे शहर दुमदुमले आहे, दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि शेकडो धारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

आषाढी एकादशी निमित्त जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू ते पंढरपुर ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात मंगळवारी सकाळी प्रस्थान झाले. लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात या वारीत सहभागी झाले आहेत. दरम्यान आज ( २६ जून ) बुधवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले आहे. लाखो वारकऱ्यांनी पुणे शहर दुमदुमले आहे, दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि शेकडो धारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

विशेष म्हणजे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या धारकऱ्यांना पालखीसमोर येऊ देऊ नका, अशी मागणी पालखी समितीने केली आहे.