ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. याआधीही शरद पवारांचा अपमान करणारी पोस्ट केतकी चितळेने केली होती. याआधी फेसबुकवर शरद पवारांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली होती. यावरून तिला भरपूर ट्रोलही केले जात होते. आता पुन्हा एकदा केतकी चितळे हिने शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केली आहे.

केतकी चितळे हिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की,

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-Advocate Nitin Bhave

भाजपकडूनही पवारांवर टीका –

शरद पवारांनी परवा साताऱ्यामध्ये जवाहर राठोड यांची `डोंगराचे ढोल’ या संग्रहातील `पाथरवट’ ही कविता लोकांसमोर आणली होती. त्यानंतर त्यावर अनेक चर्चा केल्या गेल्या.  “शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवारसाहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!” असा गंभीर आरोप करत भाजपने ट्विटर हँडलवरून शरद पवार यांचा साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ ट्विट केला होता.  तर आज अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील ‘तुका म्हणे पवारा..’ ही कविता फेसबुकला शेअर करत शरद पवारांवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या –