माझा संपूर्ण हिंदुस्तान एकरूप करण्याचा प्रयत्न ; संभाजी भिडे गुरुजी

sambhaji bhide guruji

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव येथील हिंसाचारावरून माझ्यावर चुकीचे आरोप होत असून प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. शासनाने याची सखोल चौकशी करावी. असे संभाजी भिडे गुरुजी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

गुरुजी निवेदनात म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी माझ्या अटकेची मागणी केली आहे. मात्र १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवेळी मी उपस्थित होतो व कारणीभूत आहे असे चुकीचे विधान केले जात आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी मी सांगलीला मुक्कामी असताना त्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे. तसेच मी व माझे कार्यकत्रे सर्व हिंदुस्थान एकरूप करण्याचा प्रयत्न करीत असताना. मला याकूब मेमनची वाट दाखविण्याची मागणी केली आहे. माज्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून शासनाने याची सखोल चौकशी करावी. असे निवेदन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी गुरुवारी दिले आहे.