रांजणगावच्या लिफ्ट योजना कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार–आ.बाळासाहेब मुरकुटे

रांजणगावदेवी(वार्ताहर):–रांजणगावदेवी पाणी उपसा जलसिंचन योजनेचेे(लिफ्ट) थकीत कर्ज माफ व्हावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले.
नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील अष्टविनायक तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात आ.मुरकुटे बोलत होते.

आ.मुरकुटे पुढे म्हणाले,आई-वडील,देश व गुरूंची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे.जलसंधारण हा विषय काळाची गरज बनलेला आहे.भूजल पातळी वाढविण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग हे प्रभावी माध्यम आहे.यात लोकसहभाग महत्वाचा आहे.जलयुक्त शिवारमुळे राजनगावचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झालेली आहे.राजणगावाला देवीची साडेतीन शक्तीपीठे असून गावाला पुरातन महत्व आहे.तीर्थक्षेत्र विकासात समावेश झाल्याशिवाय देवस्थानचा विकास होणार नाही.यासाठी मंदिराचे ट्रस्ट स्थापन केल्यास ब वर्गात समावेश करू. रांजणगावातील शेतकरी लिफ्ट कर्जाने बेजार आहेत.माझी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली असून लिफ्ट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे उतारे कोरे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.अष्टविनायक तरुण मंडळाचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत.

माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले,शिक्षणाच्या पायावरच समाज उभा आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील दातृत्ववान माणसांनी शाळांच्या विकासासाठी पुढे येऊन आर्थिक मदत केली पाहिजे.मंदिरे खूप झालीत आता खरी गरज आहे ती ज्ञान मंदिरे व जल मंदिरांची.शेती करतांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याची गरज आहे.मागील तीन चार वर्षात दुष्काळ व पाणी टंचाईमुळे अडचणी आल्या परंतु या पुढील काळात ज्ञानेश्वर कारखाना जिल्ह्यात ऊस भावाचे बाबतीत कधीच मागे राहणार नाही.

You might also like
Comments
Loading...