कुख्यात गुंड गुडड्‍याच्या समर्थकांनी एसटी बसवर फेकला पेटता गोळा

धुळे : कुख्यात गुंड गुड्ड्याच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मारेकरी अद्याप फरार आहेत. मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. दुसरीकडे, शुक्रवारी गुडड्‍याचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी एसटी बसवर पेटता गोळा फेकून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.
गुड्ड्याचा खून आणि व्हायरल झालेली क्लिप यामुळे तीन दिवसांपासून शहरात तणाव पसरला आहे. त्यात आता पोलिसांनी खुनाच्या सुपारीकडे लक्ष वळविले आहे. एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधिताची गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शफियोद्दीन शेख याने सुपारी घेतली होती. त्याला दमही दिला होता. याची चाहूल लागताच सुपारी उलटविण्यात आली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकीकडे मारेकऱ्यांचा सुगावा घेताना पोलिसांनी राजकारणी व्यक्तीवरही पाळत ठेवली आहे. त्याची इत्थंभूत माहिती हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
शहरात गुन्ह्यांमध्ये अडकलेला सराईत गुंड गुड्ड्या हा रागीट-खुनशी स्वभावाचा होता. वाद झाल्यानंतर जागीच धमकावण्याचा त्याचा स्वभाव होता. शिवाय धमकीप्रमाणे त्याने काहींचा काटाही काढला. शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या एका राजकारण्यावर त्याचा राग होता. काही दिवसांपूर्वी गुड्ड्या जामिनावर बाहेर आला. त्या वेळी एका मालमत्ता खरेदीची या राजकीय नेत्याने तयारी दर्शविली. मुळात याच मालमत्तेवर गुड्ड्याचा डोळा होता. त्यामुळे त्याचा जुना राग वाद उफाळून आला. त्याने दमदाटी सोबत संबंधिताला धमकीही दिली. तर दुसरीकडे राजकारणात डोईजड झालेल्या या व्यक्तीची सुपारी गुड्ड्याला देण्यात आली. त्याचा सुगावा संबंधित व्यक्तीला लागला. अशी चर्चा थेट पोलिसांच्या कानापर्यंत जाऊन पोहाेचली आहे. त्यामुळे तपासातून कोणतीही चूक राहू नये म्हणून आता त्या घटनेचा गुड्ड्याच्या खुनाशी धागा जुळवून पाहण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
गुड्ड्याला आपली सुपारी मिळाल्याची माहिती गुड्ड्याच्या प्रतिस्पर्धींनी या राजकीय पुढाऱ्यापर्यंत पोहाेचविली. त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत गुड्ड्याचा खून झाला. त्यामुळे ही सुपारी गुड्ड्यावर उलटल्याचा संशय अाहे. पोलिसही आता या दिशेने तपास करीत अाहेत. गुड्ड्याच्या खुनानंतर तिसऱ्या दिवशीही मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. संशयित मारेकरी कुटुंबासह पसार झाले आहेत. पोलिसांनी शेजारी जिल्ह्यांमध्येही त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी एक पथक नाशिकला रवाना झाले आहे. सायंकाळपर्यंत या पथकाच्या हाती संशयित लागले नव्हते. तर दुसरीकडे मारेकरी थेट परराज्यात पळाल्याचा अंदाज आहे.
एकीकडेखुनाचा तपास सुरू असताना  बुधवारी रात्री गुड्ड्याचे प्राबल्य असलेल्या चाळीसगाव रोड एेंशी फुटीरोड या ठिकाणी दगडफेकीची घटना घडली. तशी माहिती काही नागरिकांनी पोलिसांनाही दिली. यानंतर अनेक अधिकारी या ठिकाणी पोहाेचले. घटनेला आझादनगर पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. तथापि एका अधिकाऱ्याने मात्र यास अधिकृत दुजोरा दिला आहे. गुड्ड्या समर्थक मेंटल म्हणून संबोधल्या जाणाऱ्या एका समाजकंटकाने हा प्रकार केल्याची माहिती पोलिस देतात.
खूनातीन आरोपींची माहिती देणार्‍यास दहा हजार ते 50 हजारांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी जाहीर केले आहे. माहिती सांगणार्‍यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विलास गोयर, विजय गोयर, विक्की गोयर, शाम गोयर, राजा उर्फ भद्रा देवर, भीमा देवरे, यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. गेल्या चार दिवसांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण, त्यांना अद्याप त्यांना  यश आलेले नाही. त्यात खूनाची ’CCTV क्लिप’ सर्वच ठिकाणी व्हायरल झाली आहे. ती यू-ट्यूबवरही जाऊन पोहोचली आहे. यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले आहे. विविध स्तरावरुन आरोपींना अटक करण्याचा दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाने फरार आरोपींवर बक्षीस जाहिर केले आहे.  या खूनाच्या गुन्ह्यातील  आरोपींची माहिती देणार्‍यांना 10 हजार ते 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणार्‍यांची नावे गुपित ठेवण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सांगितले आहे.
आरोपींची माहिती मिळाल्यास येथे कळवा.
धुळे जिल्हा नियंत्रण कक्ष क्र.02562-288211,228212,
हिंमतराव जाधव मोबाईल क्र.9423985098,
निरीक्षक रमेशसिंग परदेशी मो.क्र.9765882654,
निरीक्षक अनिल वडनेरे मो.क्र.9823835211