‘पुढच्या वेळी अर्णबच्या आधी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसनही केलं. यावेळी त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा कानमंत्रंही दिला.

यावरून अनेकदा ट्विट करून टीका करणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली आहे. यावेळी कुणाल म्हणाला पुढीलवेळी अर्णब गोस्वामीला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा, असे खोचक ट्विट कुणाल कामराने केले आहे.

त्याच बरोबर त्याने या ट्विटसह ‘कठीण प्रश्न पहिले सोडवावे’ हा मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याचा फोटो पोस्ट केला आहे. पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांना एकही मुलाखत दिलेली नाही, कुमार यांनी देखील याआधी मुलाखतीचे आवाहन दिले होते. मात्र, अद्याप मोदींनी मुलाखत दिलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या :