राजस्थान: राजस्थानातील कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची आज उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती रणदिपसिंह सुरजेवाल यांनी दिली आहे. तसेच पायलट यांच्याकडे जी खाती आहेत ती ही काढून घेण्यात आली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले काही वेळापूर्वी पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी केली होती.
गेले २ दिवस राजस्थानमध्ये राजकीय नाट्यानंतर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करत काँग्रेसने कारवाई केली आहे. तर, आता पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी गेली जाऊ शकते अशी चर्चा असतानाच सचिन पायलट यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं.” त्यामुळेच आता पायलट भविष्यात काय राजकीय भूकंप आणतात हे पाहणं महत्वाचं असून राजस्थान सरकारबाबत खूप मोठी अस्थिरता निर्माण होत आहे.
सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।
— Sachin Pilot (@SachinPilot) July 14, 2020
तर, पयलट यांची हकालपट्टी केल्यानंतर सुरजेवाला म्हणाले, “सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि विश्वेंदर सिंह आणि रमेश मिना यांना मंत्रिपदावरुन तात्काळ काढलं जात आहे. राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदावर राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह यांची नियुक्ती करण्यात येते. ते शेतकरी पुत्र असून त्यांनी शेतीच्या मशागतीसोबतच काँग्रेसची देखील मशागत केली. ते जिल्हाध्यक्ष पदावरुन इथपर्यंत आले आहेत.”
सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी…
दरम्यान, पायलट यांनी भाजपामध्ये जाण्याचे दावे फेटाळले होते. त्यामुळे आता ते कोणता मार्ग निवडतात हे महत्वाचं असून भाजपाला देखील राजस्थानमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ करण्यासाठी खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल.
आता भाजपाने एकदा स्वतंत्र लढवूनच बघाव, जयंत पाटलांच जोरदार प्रत्युत्तर