Video- विश्वास नांगरे पाटील खोटे बोलत आहेत – सिद्धार्थ धेंडे

पुणे- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केलेली नाही त्यामुळे या संबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे येण्याचा प्रश्नच नाही असे स्पष्टीकरण गृह विभागाने दिल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे आणि इतर दलित संघटनांच्या प्रतिनिधींच्या समन्वय समितीने तयार केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.यापार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील खोटे बोलत असल्याचा आरोप पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केला आहे.

Request to District Collector to inquire about Bhima Koregaon riots

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा या ठिकाणी उसळलेल्या दंगलीनंतर पहिल्यांदाच पुण्यात आयोजित पत्रकार परिषद घेतली यावेळी पत्रकारांनी समन्वय समितीने दिलेल्या अहवालाबद्दल आठवले आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांना प्रश्न विचारले त्यावेळी बोलताना नांगरे पाटलांवर खोटे बोलण्याचा आरोप धेंडे यांनी केला .

Loading...

काय म्हणाले सिद्धार्थ धेंडे ?

“कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या दंगली नंतर स्थापन झालेली समिती हि समन्वय समिती होती.या समन्वय समितीने जेवढे पुरावे आहेत ते आम्ही जमा करून पोलिसांना दिले आहेत. पोलिसांचा तपास योग्य दिशेने व्हावा याकरिता हि समिती कार्य करत होती.पुराव्यांच्या आधारावरच आम्ही अहवाल तयार करून पोलिसांना दिला आहे. नांगरे पाटील खोटं बोलत असून पाहिजे तर त्यावेळचे मिनिट्स घ्या फोटो घ्या त्यावेळेचे ऑडीओ आहेत सगळं ऑन रेकोर्ड आहे “.