महाजनांची सेल्फी म्हणजे ‘निर्लज्जम सदासुखी आणि निर्लज्जपणाचा कळस’ : तृप्ती देसाई

blank

टीम महाराष्ट्र देशा :पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, यामध्येच सांगलीतील ब्राम्हणाळ येथे बोट उलटून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगलीतील चित्र सामान्य नागरिकांचे ह्रदय पिळवटून टाकत आहे, दुसरीकडे मात्र राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांची माणुसकी आटली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पुराची पाहणी करत आहेत. महाजन हे बोटीत स्वार होऊन कोल्हापूर सांगलीच्या भागामध्ये फिरत आहेत, यावेळी महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, तर महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावरून भुमाता ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगली आणि कोल्हापूर मधिल पुराची भीषण स्थिती पाहण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी सेल्फी काढून नागरिकांची थट्टा केली आहे.निर्लज्जम सदासुखी, निर्लज्जपणाचा कळस म्हणूनच गिरीश महाजन यांचा येथे उल्लेख करता येईल.

याला सांगलीकर, कोल्हापूरकर कधीच माफ करणार नाहीत. ‘मुख्यमंत्री साहेब योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय आपत्ती म्हणुन जाहीर करू’, असे आपण म्हणालात. आपली जनादेशयात्रा झाली, काहीजणांची जनआशीर्वाद यात्रा झाली ,काहीजणांची शिवस्वराज्य यात्रा झाली पण इथे जनता मरण यात्रेत आहे त्यांना पहिले सुरक्षितपणे बाहेर काढणे गरजेचे त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा अशी मागणी केली.

तसेच तुम्ही आणि चंद्रकांत दादा पाटील म्हणता की, आपकी बार २२० पार परंतु आता आपल्या कार्यकर्त्यांना सांगा ना की, अबकी बार पूरग्रस्त नागरिक सुरक्षित पार म्हणून सगळ्यांना मदतीला तिथे उतरण्याचे आदेश द्या. इतका असंवेदनशीलपणा दाखवू नका आणि पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी करताना सरकारने कृपया चेष्टा करू नये हीच विनंती अशा शब्दात महाजन आणि सरकारवर टीका केली आहे.

महापूर सेल्फीनंतर महाजनांनी पाण्यात उतरून घेतला आढावा

 

बहिणींना माहेरच्या आधाराची गरज, चला सगळे मिळून संसार उभा करूया : जितेंद्र आव्हाड

 

भाजप २५० जागा जिंकणार, मग बाकीच्या जागांमध्ये आम्ही गोट्या खेळायच्या का ?’