यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही – तृप्ती देसाई

अहमदनगर : ‘मी ते वाक्य बोललोच नाही. मी असं कीर्तन केलंच नाही.’ असं स्पष्टीकरण कीर्तनकार इंदुरीकर यांनी दिलं आहे. कीर्तनकार इंदुरीकर यांनी बुधवारी (ता.19) पीसीपीएनडीटी कायद्यानुसार मिळालेल्या नोटीसला शेवटच्या दिवशी उत्तर दिलं. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांनी नोटीशीला उत्तर दिलं, त्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तिखट शब्दात महाराजांचा समाचार घेतला आहे. याबाबत ते अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी यापुढे ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांना महाराज म्हणणार नाही,’ असं त्या म्हणाल्या.

Loading...

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘मी त्यांना या आधीही इंदुरीकर महाराज असंच म्हणत होते. पण ज्या पद्धतीने त्यांनी नोटीशीला उत्तर दिलं आहे, ते मला त्यांच्याकडून अपेक्षित नाही. मी असं बोललोच नाही, आणि या ठिकाणावर कीर्तन झालंच नाही, ही जनतेची दिशाभूल आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

दरम्यान, इंदुरीकर यांच्याविरोधात तक्रार देण्यावर मी अजूनही ठाम आहे, खोटं बोलण्याचा गुन्हा देखील त्यात आता टाकावा लागेल. मी तक्रार न करण्याचा प्रश्नच नाही, कारण ज्या पद्धतीने इंदुरीकरांच्या समर्थकांनी मला सोशल मीडियावर अश्लील शब्द वापरले आहेत, अपमान केला आहे, तो विसरण्यासारखा नाही,’ असं त्या म्हणाल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....