तृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले

trupti-desai

तिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेला वाद आता आणखी चिघळणार आहे. भक्तांच्या निदर्शनांमुळे 10 ते 50 वर्षे वयोगटाच्या महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी येत्या शनिवारी (17 नोव्हेंबर) मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केरळमध्ये पोहोचल्या आहेत. मात्र, येथील विमानतळावर आगमन होताच त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागलेय. आता त्या विमानतळावरुन कधी बाहेर पडणार आणि त्या मंदिरात प्रवेश करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुतक युगांचे फिटले… दलित युवकाला खांद्यावर बसवून मंदिरात नेले वाजत-गाजत