कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत – तृप्ती देसाई

पुणे : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते. या बेताल वक्तव्याने इंदुरीकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. इंदोरीकरांविरुद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई न केल्याने आता अहमदनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य समन्वयक रंजना गावंडे यांनी नोटिस बजावली आहे. इंदोरीकर महाराजांवर 15 दिवसांत कारवाई न केल्यास यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल करणार असल्याचे रंजना गावंडे यांनी सांगितले आहे.

गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध समितीने (पीसीपीएनडीटी) इंदोरीकर महाराज यांना नोटीस बजावली होती. त्यावर खुलासा करत ‘मी असं कीर्तन केलंच नाही, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलंच नाही..मी युट्युबला आम्ही काही टाकत नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते. मात्र, ज्या वर्तमान पत्रात हे छापून आले त्यांनी उत्तर अजून दिले नाही, त्यांनी पुरावे द्यावे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले होते.

Loading...

त्यानंतर आता पुन्हा एकदा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. कीर्तनकार कसे असतात ? याची व्याख्याच जिथे करवत नाही ते कीर्तन म्हणजे इंदुरीकरांचे. सातत्याने महिलांचा अपमान करणे, पांचट भाषा वापरणे, भेदभावा संदर्भात संदेश देणे.यासंदर्भात सुरुवातीला मी जे बोललो ते योग्यच बोललो ,ग्रंथाचा आधार घेऊन बोललो असे सांगणारे अचानकच पलटले आणि मी ते वाक्य बोललोच नाही असे लेखी लिहून दिले आणि तिथेच आणखी खोलात पाय अडकायला सुरुवात झाली. जरी पीसीपीएनडीटी आणि सायबर सेलने तुर्तास दिलासा दिला असला तरी अनेक कीर्तने सध्या पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर तृप्ती देसाईंची दहशत आहे, कारण महिला सन्मानासाठी आम्ही मागेपुढे पाहत नाही हा आमचा पण इतिहास आहे. असा घणाघात तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्ट लिहून केला आहे.

तृप्ती देसाई यांची फेसबुक पोस्ट

कीर्तनकार कसे असतात ? याची व्याख्याच जिथे करवत नाही ते कीर्तन म्हणजे इंदुरीकरांचे. सातत्याने महिलांचा अपमान करणे, पांचट भाषा वापरणे, भेदभावा संदर्भात संदेश देणे.यासंदर्भात सुरुवातीला मी जे बोललो ते योग्यच बोललो ,ग्रंथाचा आधार घेऊन बोललो असे सांगणारे अचानकच पलटले आणि मी ते वाक्य बोललोच नाही असे लेखी लिहून दिले आणि तिथेच आणखी खोलात पाय अडकायला सुरुवात झाली. जरी पीसीपीएनडीटी आणि सायबर सेलने तुर्तास दिलासा दिला असला तरी अनेक कीर्तने सध्या पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर तृप्ती देसाईंची दहशत आहे, कारण महिला सन्मानासाठी आम्ही मागेपुढे पाहत नाही हा आमचा पण इतिहास आहे.

सध्या अनेक कीर्तनामध्ये आयोजकांना बाऊन्सर देऊन कीर्तनकाराला प्रोटेक्शन द्यावे लागते आणि पोलीस बंदोबस्तात कीर्तन करावे लागते, युट्युब वरील स्वतःचेच व्हिडीओ डिलीट करावे लागतात, इथेच तर आम्ही अर्धी लढाई जिंकलो.

सध्या कीर्तनाचे व्हिडिओ शूटिंग काढायला परवानगी नाही तसेच चॅनलच्या प्रतिनिधींना सोडले जात नाही कारण जुन्या सवयी लवकर मोडणार नाहीत आणि जर काही चुकीचे आपण बोललो तर तातडीने कारवाई होऊ शकते ही भीती म्हणजेच आमचा आक्रमक आवाज योग्य दिशेने सुरू आहे, याची आलेली प्रचिती.

काल 26 फेब्रुवारी रोजी पुण्यात किर्तन होते असे समजले. मला या कीर्तनाविषयी माहिती नव्हती परंतु मी तिथे येणार आणि गोंधळ घालणार अशी अफवा पसरवली होती आणि पोलिसांना कोणीतरी कळवले होते.. हीच तर आमची महिलांच्या सन्मान विषयी आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी काम करण्याची आक्रमक पद्धत आहे आम्हाला काही गोष्टी माहितीही नसतात परंतु समोरच्याला धडकी भरते.

सध्या तर तृप्ती देसाई ना काहीही बोला आणि तो व्हिडिओ शेअर करा किंवा तृप्ती देसाई यांची बदनामी करून पोस्ट शेअर करा म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळते , यासाठी अनेक जण प्रसिद्धीसाठी हपापलेले असून पोस्टद्वारे अश्लील भाषा वापरून ते स्वतःचीच लायकी दाखवत आहेत.

बरं जे कोणी समर्थक माझ्यावर अश्लील भाषा आणि निराधारआरोप करीत आहेत त्यांचीच मोठी क्रिमिनल पार्श्वभूमी असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे अनेक पुरावे आमच्याकडे आलेले आहेत,अजूनही फेसबुक वर माझ्या पोस्टला आई वरून शिव्या देणारे आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलणारे समर्थक आहेत यावरूनच ते ज्यांचे समर्थन करतात त्या गुरूंची शिकवण लक्षात येते.

मी या सर्वावर काहीच बोलणार नाही ,कारण माझा मी घेतलेल्या निर्णयावर आणि त्यासंदर्भात होणाऱ्या (Action) कृतीवर विश्वास आहे आणि कृती करून दाखवणारच… आगे,आगे देखो -होता है क्या ? स्वामी विवेकानंदांनी सांगितलेले आहे, की तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेले, तर विजय तुमचा असतो हे लक्षात ठेवा.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका