बीड : गेल्या दोन आठवड्यांपासून परळी येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी शनिवारी आपल्या सहकाऱ्यांसह परळीतील वसंतनगर तांडा येथील पूजाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
पूजाच्या मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी आणि दोषींवर कारवाई होण्यासाठी तुम्ही पुढे यावे कुणाचा दबाव असेल तर सांगा आम्ही तुमच्यासोबत आहोत असे आवाहन तृप्ती देसाई यांनी आवाहन तिच्या वडिलांना केले. मात्र, आमचा कुणावर कसलाही संशय नसून कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे लहू चव्हाण यांनी सांगितले. यावर तृप्ती थेट तेथून बाहेर पडल्या.
२० फेब्रुवारी २०२१ रोजी पूजाचा तेरावा असल्याने तिचे नातेवाईक आले होते. दुपारी दीड वाजता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या त्यांचे सहकारी भरत नवशिंदे, शेख मगदूम, स्वाती वट्टमवार, रेणुका मुळे यांच्यासोबत वसंतनगर येथे दाखल झाल्या त्यांनी पूजाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अंत्यसंस्कार केलेल्या जागेची पाहणी केली. यानंतर पूजाच्या आई-वडिलांशी चर्चा करताना कौटुंबिक माहिती विचारत पूजाचा व तुमचा शेवटचा संपर्क कधी झाला, तिचे शवविच्छेदन झाले का? अशी विचारणा करत तुम्हाला या प्रकरणात कुणावर संशय आहे का? तुम्ही या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी पुढे या, असे आवाहन तृप्ती देसाई यांनी केले.
यानंतर आई-वडिलांनी आमची काहीच तक्रार नसल्याचे सांगताच त्या आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडल्या. पूजा चव्हाणच्या घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकरणी सीबीआय चौकशी करून संबंधित मंत्री व प्रकरणातील इतरांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ८ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी कडक निर्बंध लावणार – छगन भुजबळ
- राणा दाम्पत्याला विना मास्क ‘बुलेट वारी’ पडली महागात, गुन्हा दाखल
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा बंद !
- कोरोना विषाणू घातक, काळजी घेण्याची गरज : शरद पवार
- काँग्रेसच्या जन आक्रोश रॅलीत ‘लैला मै लैला’चे लागले ठुमके