मोदींची केदारनाथ यात्रा आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी : तृणमूल कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा :लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्यातील मतदान आज होत आहे. सात राज्यांतील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. तत्पूर्वी शुक्रवारी अंतिम टप्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना काही दिवसांची उसंत मिळाली. ही उसंत मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ यात्रा काढली. मात्र ही यात्रा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे असा आरोप करत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहित मोदींच्या यात्रेवर आक्षेप नोंदवला आहे.

या पत्रामध्ये तृणमूल काँग्रेसने लिहिलं आहे की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान अजून संपलेलं नाही. तेरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेवर आहेत मात्र या यात्रेला मिडीयाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे असं लिहिण्यात आलं आहे.

Loading...

दरम्यान यासंदर्भात निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाची देखील कानउघडणी केली होती.तर मोदींच्या या यात्रेवर राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवला असून खवचट टीका देखील केल्या आहेत.

‘मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन’ धनंजय मुंडेंनी उडवली मोदींची खिल्ली

प्रचारातून सुट्टी मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाच्या दर्शनाला

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले