सॅन फ्रान्सिस्कोमधील रशियाचा वाणिज्य दुतावास बंद करण्याचे ट्रम्प प्रशासनाचे आदेश

वॉशिंग्टन : सॅन फ्रान्सिस्को शहरात असलेले रशियाचे वाणिज्य दुतावास बंद करण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत . याबरोबरच वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये असलेल्या दोन इमारतीदेखील बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत .

यावरुन रशिया आणि अमेरिकेतील संबंधांमधील तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जुलैमध्ये 755 अमेरिकेच्या राजदूतांना रशिया सोडून जाण्याचे आदेश दिले होते. रशियाने ज्या प्रमाणे अमेरिकेच्या राजदूतांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे अमेरिकादेखील याच न्यायाने त्याची अंमलबजावणी करत असल्याचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता हीथर नॉर्ट यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेत रशियाच्या नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

Comments
Loading...