पण खरा तृप्त झालो ते आईच्या प्रेमाने …- धनंजय मुंडे

dhananjay Munde aai

मेरी ख़्वाहिश है कि मैं फिर से फ़रिश्ता हो जाऊँ
माँ से इस तरह लिपट जाऊँ कि बच्चा हो जाऊँ

धनंजय मुंडे नाव सध्याच्या राजकारणात सर्वात चर्चेत असणारे नाव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते असलेले धनंजय मुंडे हे जेंव्हा सभागृहात बोलतात तेंव्हा भल्या-भल्यांना घाम फोडतात. मात्र मुंडे साहेबांच नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. ते धनंजय मुंडे आणि त्यांच्या आईच्या प्रेमामुळे. गेली काही दिवस धनंजय मुंडे आणि त्यांच्या आईचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकताच मुंडे यांना, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द एयर २०१८ पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार मिळाला त्यामुळे जगाने कौतुक केले पण आज खरा तृप्त झालो ते आईच्या या प्रेमाने … या शब्दात मुंडेसाहेब व्यक्त झाले.

धनंजय मुंडे यांच्या चाहत्यांनी महाराष्ट्रीयन ऑफ द एयर २०१८ पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल परळी या जन्मभूमीत सत्कार सोहळा संपन्न झाला. आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणबाई मुंडे प्रथमच जाहिर कार्यक्रमात उपस्थित होत्या. विशेष म्हणजे त्यांनी सामान्यांमध्ये बसुन आपल्या मुलाचे कौतुक पाहिले ते पाहताना त्यांचे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले होते.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद इथल्या मातीत आणि माणसात आहे ते मी करून दाखवतो तुम्ही फक्त त्यासाठी साथ आणि आशिर्वाद द्या अशी भावनिक साद परळीकरांना घातली. तसेच स्व.अण्णा, स्व.मुंडे साहेब असते तर त्यांची ही छाती अभिमानाने फुलुन गेली असती. वा रे पठ्या! म्हणुन त्यांनी ही पाठ थोपटली असती हे सांगताना धनंजय मुंडेना गहिवरून आले होते.

मुंडे म्हणाले, सत्ता आल्यानंतर परळीचे संपुर्ण रूप मला बदलुन टाकायचे आहे. केवळ परळीचाच नव्हे तर संपुर्ण बीड जिल्ह्याचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. परळीच्या माणसाची मोठी शक्ती आणि ताकद आहे. या ताकदीच्या बळावरच मी आज या पदावर पोहोचलो आहे. मला राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. त्यासाठी तुम्ही साथ आणि आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.