खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे : खासदार संभाजीराजे भोसले

पुणे : गणेश उत्सव अगदी तोंडावर आला असताना पुण्यात सार्वजनिक गणपती उत्सवा वरुन चालु असलेला वाद आता शिगेला पोहचला आहे. त्यात कालच भाऊ रंगारी मंडळाच्या सद्स्यांना धमकी चे पत्र देखील आले त्यामुळे हा वाद आता अजुनच चिघळण्याची शक्यता आहे. या पार्शवभूमीवर आज खासदार संभाजीराजे भोसले यांनी भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.

काय म्हणाले खासदार संभाजीराजे भोसले

खरा इतिहास सर्वांसमोर यायला हवा भाऊ रंगारी मंडळाकडे शासकीय पुरावे आहेत. त्यामुळे या बाबत मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करून याबाबत पाठपुरावा करणार आहे. त्याकाळी भाऊ रंगारी यांनी इको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली असल्याचे पुरावे देखील आहेत. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे हे असताना टिळकांच्या भूमिकेवर आक्षेप नाही.