शहरातून अर्धा डजन दुचाकीसह ट्रक लंपास

औरंंगाबाद : गेल्या काही महिन्यापासून शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून अर्धा डजन दुचाकीसह एक छोटा हत्ती ट्रक लंपास केला आहे.

सय्यद नाजेर सय्यद चाँद (वय ३५,रा.बायजीपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफबी-६१२१) चोरट्याने ६ जुलैच्या रात्री घराजवळून चोरून नेली. गणेश रमेश पवार (वय ३१,रा.सोलेगाव,ता.गंगापूर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएफ-२८७९) चोरट्याने २४ जुलै रोजी सकाळी दहेगाव शिवारातील गणपती मंदीराजवळून चोरून नेली. मनोज पुनमचंद गांगवे (वय ३८,रा.मुकुंदवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीबी-४७१५) चोरट्याने २८ जुलैच्या रात्री घराजवळील वॉशिंग सेंटरजवळून चोरून नेली.

हरी बाबाराव सोनाळे (वय २६,रा.चिकलठाणा एमआयडीसी परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईक्यू-९१७४) चोरट्याने २० जुलैच्या रात्री घराजवळून चोरून नेली. भाऊसाहेब राजाराम वैरागळ (वय ४९,रा.राजे संभाजी सोसायटी, मोरे चौक) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीयू-३७७५) चोरट्याने २५ जुलैच्या रात्री घराजवळून चोरून नेली. सुरेश विठ्ठलराव गायकवाड (वय ५५,रा.चिकलठाणा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफबी-६४७०) चोरट्याने २५ जुलै रोजी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान घाटीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फळाच्या गाडीजवळून चोरून नेली. शेख मसीबोद्दीन शेख हिलालोद्दीन (रा.कागजीपुरा,ता.खुलताबाद) यांच्या मालकीचा छोटा हत्ती ट्रक क्रमांक (एमएच-२०-सीटी-२१९७) चोरट्याने २४ जुलै २०२० रोजी सकाळी साडेआठ ते दहा वाजेदरम्यान सलीम अली सरोवराजवळून चोरून नेला.

शहराच्या विविध भागातून दुचाकी आणि छोटा हत्ती ट्रक चोरून नेणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे जिन्सी, वाळूज, मुकुंदवाडी, एमआयडीसी सिडको, एमआयडीसी वाळूज,बेगमपुरा आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या